Puneri Patya for IPL Lovers

१. सामन्याची वेळ तुमच्या तिकिटावर छापलेली आहे, उगाच कधीही येऊन गर्दी करु नये.

२. सामन्याच्या वेळेच्या आधी ३० मिनिटे मैदानात प्रवेश दिला जाईल, तुम्ही गडबड केल्याने सामना लवकर सुरु होणार नाही.

३. खुर्चीचा वापर फक्त बसण्यासाठीच करावा. एका खुर्चीवर एकच.

४. मैदानात पिण्यासाठी (साध्या) पाण्याची व्यवस्था केली आहे, थंड तसेच फिल्टर्ड पाणी आपण दिलेल्या तिकिटाच्या पैशात मिळणार नाही, उगाचच आयोजकांकडे हट्ट धरु नये.

५. मैदानावरचे कॅमेरे हे सामन्याच्या हालचाली टिपण्यासाठी आहेत, उगाच हिडीस चाळे करुन त्यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करु नये.

६. आपण पुण्यासारख्या एका सुसंस्कृत शहरात एका सार्वजनिक ठिकाणी सामना पहात आहोत ह्याचे भान ठेऊन चियरलिडर्सना खाणाखुणा करु नये किंवा त्यांच्याकडे डोळे फाडून बघून लाज आणू नये. अश्लील चाळे कराल तर नुसतीच पोलीस कारवाई नाही तर धिंड काढण्यात येईल.

७. फुंके ( सिगारेट, बिड्या, चिलीम ), थुंके ( तंबाखु, गुटका, मावा, पान ) आणि शिंके ( तपकीर आणि स्वाईन फ्ल्युग्रस्त ) ह्यांना मैदानात मज्जाव.

८. मैदानात दारु विक्री केली जात नाही, मैदानात दारु पिऊ दिली जात नाही, मैदानात बाहेरुन दारु पिऊन आल्यास प्रवेश मिळणार नाही.

९. मैदानात विकत मिळणाऱ्या खाद्यपदार्थांची आवरणे, पिशव्या तसेच पाणी किंवा शितपेयाच्या बाटल्या मैदानात फेकू नयेत, बाटलीवरुन खेळाडू घसरुन पडून जखमी होऊ शकतो ह्याची किमान जाण ठेवावी.

१०. सामन्याच्या वेळी खेळाडूंना पाठिंबा देताना हळू आवाजात आरडाओरड करावी. हा क्रिकेटचा सामना आहे,तमाशाचा फड नव्हे.

११. अनोळखी वस्तूंना स्पर्श करु नये, व्यक्तींसह

१२. मैदानातील मोठ्ठे पंखे फक्त दुपारी आणि गर्दी असलेल्या ठिकाणीच लावण्यात येतील. पंख्याखाली बसण्यासाठी मोठ्ठ्या आवाजात भांडण करुन आयोजकांना त्रास देऊ नये.

१३. स्त्रियांचे स्वच्छतागॄह, खेळाडूंचे पॅव्हेलियन, चियरलिडर्स पोडियम, व्हीआयपी गॅलरी, पत्रकार कक्ष इत्यादी ठिकाणी उगाच जास्त घुटमळू नये.

१४. सामन्यातील कसल्याही घटनेचा ( सामना हरणे, षटकार मारणे, धावबाद होणे, झेल टाकून देणे वगैरे) राग खुर्च्यांवर काढू नये.

१५. सामना पहायला आलेल्या प्रेक्षकांचे खेळाडू, चियरलिडर्स,व्हीआयपी यांच्याबरोबर अथवा खेळपट्टी,पत्रकारकक्ष, समालोचन खोली, पॅव्हेलियन, व्हीआयपे बॉक्स इथे फोटो काढून मिळणार नाहीत किंवा त्याला परवानगी दिली जाणार नाही.

१६. सामन्याच्या वेळे दरम्यान तुटलेल्या चपला, कापलेलेखिसे, मोडलेला चष्मा, हरवलेली पर्स, गायबझालेला मोबाईल ह्यांची जबाबदारी आयोजकांकडे राहणार नाही. समोरच पोलीस स्टेशन आहे, तिकडे जाऊन तक्रार करावी.

१७. हे पुणे आहे, शिमला नव्हे. उन्हाळ्यात गरम होणारच, पण म्हणुन मैदानात सामना पहायला शर्ट काढून बसू नये. अशा निर्लज्ज प्रेक्षकांना बाहेर काढले जाईल.

१८. पाऊस पडल्यास पैसे परत मिळणार नाहीत, कॄपया हवामान खात्याशी सल्ला-मसलत करुन मगच तिकीट काढावे.

१९. परदेशी खेळाडूंच्या अंगचटीला जाऊ नये तसेच त्यांना स्थानिक भाषेत गलिच्छ आणि अश्लील शिव्या देऊन वेडावून दाखवू नये. ते आपले अतिथी आहेत, आपण घरात पाहुण्यांशी असे वागतो का ?

२०. राजकीय नेते, सरकारी अधिकारी, स्थानिक दादा ह्यांचा वशिला लाऊन फुकट पास मागू नये. परवडत नसल्यास झाडावर चढून सामना पहावा.

२१. वरील सुचना ह्या चेष्टेचा विषय नव्हे ह्याची नोंद घ्यावी, ह्याची चेष्टा करणार्या प्रेक्षकांना संपूर्ण सामना संपोस्तोवर अंधाऱ्या खोलीत बळजबरीने बसवून ठेवले जाईल. 


ह्या पाट्या आहेत त्या आयपीएल-पुणे संघाच्या कार्यालयातल्या -
१. फक्त दिवसाचे सामने खेळले जातील, त्यातही दुपारी १-३ असा विश्रांतीचा वेळ राखून ठेवावा लागेल.

२. रात्रीच्या सामन्याचा चार्ज वेगळा पडेल, कुठल्याही परिस्थितीत रात्री ८ वाजता सामना संपवण्याची जबाबदारी आयोजकांची राहिल, सवड मिळाल्यास उरलेला सामना दुसऱ्या दिवशी खेळता येईल.


३. सोमवारी सुट्टी घेतली जाईल.


४. सर्व लोकांना जाहीर निवेदन देण्यात येते की "आयपीएल-पुणे संघ ( पुण्याचा अभिमान, महाराष्ट्राची शान ) " ही आमचा पुर्णपणे स्वतंत्र संघ असुन, "मुंबई इंडियन्स, महाराष्ट्र" ह्या संघाशी आमचा कसलाही संबंध नाही.त्या संघाशी केलेल्या व्यवहाराची जबाबदारी केवळ तो मराठी आहे ह्या कारणाने घेतली जाणार नाही. तसेचत्या संघाच्याविषयी आमच्याकडे कसलीच चौकशी करु नये.

५. हा क्रिकेटचा संघ आहे. उगाच गाण्याच्या स्पर्धा, नाचकामाचे कार्यक्रम, पाणपोईचे उद्घाटन, नव्या दुकानाची चित्रफीत कापणे ह्या आणि अशाच इतर कामांसाठी खेळाडूंची चौकशी अथवा मागणी करु नये.

६. क्रिकेट हा एक खेळ आहे ह्याचे भान ठेवावे, आम्ही मॅचफिक्सींग करत नसल्याने जिंकण्याची कसलीच गॅरेंटी देता येणार नाही.

७. देणग्या मागणारे, गौरवनिधी सामने आयोजीत करणारे, सर्व्हे करणारे, फुकटात जाहीरातीसाठी कार्यक्रमाला हजेरी लावण्याची विनंती करण्याची शिष्ठमंडळे आदी तत्सम व्यक्ती किंवा संस्था ह्यांना सक्तप्रवेश बंदी आहे, ह्यात कोणत्याही कारणास्तव बदल होणार नाही.

८. आमचे प्रतिस्पर्धी संघ कमी किमतीत खेळत असल्याच्या बढाया आमच्यासमोर मारू नये. आमचे इथे क्वालिटीला प्राधान्य असल्याने कमी किमतीत सामना खेळवण्याचा विचार केला जाणार नाही.

९. आपण आमच्या खेळाबद्दल समाधानी असताल तर इतरांना सांगा, नसाल तर योग्य आणि सभ्य शब्दात आम्हाला सांगा, योग्य दखल घेतली जाईल.

१०. आमचेकडे शाळकरी संघांना ट्रेनिंग दिले जात नाही

११. आमच्याशी ठरलेल्या करारानुसार सामना झाल्यावर आमच्याकडून सदिच्छा म्हणून खेळाडूंचे टी-शर्ट्स,ट्रॅक सुट्स, टोप्या, बॅटी, चेंडू अथवा तत्सम कुठलेही किमती सामान भेट मिळणार नाही. उगाच हावरटपणाकरु नये.
 

1 comments:

akash kadam said...

nice piece of information, I had come to know about your internet site from my friend vinay, delhi,i have read atleast 12 posts of yours by now, and let me tell you, your website gives the best and the most interesting information. This is just the kind of information that i had been looking for, i'm already your rss reader now and i would regularly watch out for the new post, once again hats off to you! Thanx a ton once again, Regards, Marathi Kavita SMS Jokes Ukhane Recipes Charolya Suvichar Shayari

Post a Comment